JIGARI



                          

                                   "जिगरी"


                            ‘शहा अँड शहा कंपनी’ 
                            निर्मित हा मराठी चित्रपट. 

            "जिगरी"  चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीला....



           
                     जिगरी चा फर्स्ट लूक रिलीज...!!!

चित्रपटाचे लेखक :- प्रवीण रंगनाथ चौगुले


मराठी चित्रपट सृष्टिमध्ये प्रथमच नव्याने येणारे कलाकार म्हणून राहुल राजे आणि पुजा चांदुरकर या नवोदित कलाकार प्रमुख भूमिका असलेल्या जोडीचा हा चित्रपट..

जिगरी’ या मराठी चित्रपटाचे फायनली पोस्टर प्रदर्शित सोहळा       दि. ९ नोव्हेंबर2019 रोजी मुंबई येथे संपन्न झाला.

मराठी चित्रपट सृष्टिमध्ये प्रथमच नव्याने येणारे कलाकार म्हणून..


                             अभिनेते राहुल राजे 



                        अभिनेत्या पूजा चांदुरकर


मुंबई- दिल, दोस्ती आणि प्रेम या आगळ्या-वेगळ्या विषयावर आधारित...."जिगरी" या मराठी चित्रपटाचे फायनली पोस्टर प्रदर्शित सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.


चित्रपटाची निर्मिती "शहा अँड शहा कंपनी" ने केली असून या चित्रपटाचे निर्माते हिमांशु शहा आणि रश्मी शहा हे आहेत.



पोकलेन ड्राइवर अशी ओळख असलेले या चित्रपटाचे लेखक प्रवीण रंगनाथ चौगुले यांच्या दर्जेदार लेखणीतुन हा अस्सल गावठी मातीतला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. तिन वर्षाच्या अथक व यशस्वी प्रयत्नानंतर ‘शहा अँड शहा कंपनी’ निर्मित हा मराठी चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.





मुख्य भूमिकेत राहुल राजे, विनोद शहा, पूजा चांदुरकर सोबतच ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आदींनी आपल्या अभिनयाचा ठसा या चित्रपटमध्ये हे ठेवला आहे. अस्सल गावरान मातीतील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे तसेच मैत्रीचे , मैत्री प्रेमाचे दर्शन घडवणारे तसेच मराठी फिल्म मध्ये हे एक वेगळे नाव कमवणार आहे असे दिसते.




 या चित्रपटाची कथा पटकथा संवाद प्रवीण चौगुले लिखित आहे तसेच निलेश कोचळे यांनी संवाद लेखनासाठी महत्वाचे साहाय्य केले आहे. 
 संगीत रोहित नागभिडे व फिल्ममधील गीतांना आदर्श शिंदे यांनी आवाज दिलेला आहे, कलादिग्दर्शन मठपती, नृत्यदिग्दर्शन प्राण यांनी सांभाळले आहे तर चित्रपटाचे चित्रीकरण शांताराम भोसले यांनी केले आहे




चित्रपटाचे पोस्टर बघीतल्यावर आपल्याला अंदाज आलाच असेल, नक्कीच...अतिशय रोमांचकारी दिल,दोस्ती आणि प्रेम असा हा सिनेमा आपल्या भेटीला लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे.. 

             
चित्रपटसृष्टीला समूळ बदलून टाकणारा..!!!

                                            

                             [Blog by :- Mgd-official] 

Comments

Popular Posts